निराधार लाभार्थ्यांना थकीत रक्कम तातडीने देण्यात यावी - राजु धावंजेवार

सह्याद्री चौफेर| ऑनलाईन

वणी : संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांची रक्कम थकीत असल्याने ती रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्यात यावी अशी मागणी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांचे मानधन मिळाले नसल्याने त्यांना त्यांच्या मूलभुत गरजा भागवणे कठीण झाले आहे. लाभार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी बँकेत जावे लागते, बँकेत गेले असता पैसे आले नाही असे उत्तर दिल्या जाते व तहसील कार्यालयात जावून चौकशी करा असे सांगितल्या जाते. यामूळे नाईलाजास्तव लाभार्थ्यांना रिकाम्या हाताने परत यावे लागते. 

शासनाकडून मिळत असलेल्या रकमेच्या भरवश्यावर लाभार्थ्यांना महिनाभर सांभाळून खर्च करावा लागतो. लाभार्थ्यांना शासनाकडून निराधार योजनेचे पैसे न मिळाल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशाप्रकारे मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्य अध्यक्ष राजु धावंजेवार यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती पत्र दिले आहे.
निराधार लाभार्थ्यांना थकीत रक्कम तातडीने देण्यात यावी - राजु धावंजेवार निराधार लाभार्थ्यांना थकीत रक्कम तातडीने देण्यात यावी - राजु धावंजेवार Reviewed by सह्याद्री चौफेर on April 02, 2025 Rating: 5
Powered by Blogger.