मृतकाच्या वारसाला स्टेट बँकेकडून दोन लाखाचा धनादेश प्रदान

सह्याद्री चौफेर| ऑनलाईन

मारेगाव : भारतीय स्टेट बँक मारेगाव अंतर्गत स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्र (मन कम्प्युटर) चे संचालक सचिन उमाकांत फरकाडे यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेचा लाभ स्टेट बँक ऑफ इंडिया मारेगाव येथील शाखा व्यवस्थापक वैशाली रंगारी, कर्मचारी सिम गोरखेडे, सीएसपी संचालक सचिन फरकाडे यांच्या उपस्थितीत मृत महिलेचे नॉमिनी दीपक आनंद ताकसांडे याला 2 लाख रुपयेचा धनादेश देण्यात आला. 

जानेवारी महिन्यात मंदा आनंद ताकसांडे यांचा कॅन्सरने मृत्यू झाला होता. मात्र, त्याआधी त्यांचा स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्र (मन कम्प्युटर) मधून त्यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योति बिमा (436) काढलेला होता, त्या विम्याचा लाभ म्हणून 02/04/2025 ला मृतक महिलेचा मुलगा दीपक ताकसांडे याला दोन लाखाचा धनादेश प्रदान करण्यात आला आहे. 

या योजनेचा लाभ सर्व लोकांनी घ्यावा,असे स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापक वैशाली रंगारी यांनी यावेळी म्हटलेले आहे. 
मृतकाच्या वारसाला स्टेट बँकेकडून दोन लाखाचा धनादेश प्रदान मृतकाच्या वारसाला स्टेट बँकेकडून दोन लाखाचा धनादेश प्रदान Reviewed by सह्याद्री चौफेर on April 02, 2025 Rating: 5
Powered by Blogger.