वणीत महामानवाला वंदन करण्यासाठी उसळला जनसागर

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : बोधिसत्व, क्रांतिसूर्य, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठी गर्दी उसळल्याचे बघायला मिळाले. यावेळी मोठ्या संख्येने भीम अनुयायी जल्लोष करताना दिसून आले आहे.

शहराच्या अनेक भागातून रॅली आणि मिरवणूक काढत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी फटाक्यांची ही अतिषबाजी करत जयंती साजरी करण्यात आली.

डॉ. बाबासाहेबांची जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. 14 एप्रिल 1891 साली या दिवशी बाबासाहेबांचा जन्म झाला. आंबेडकर जयंती समता दिवस म्हणूनही ओळखली जाते, कारण बाबासाहेबांनी आयुष्यभर समानतेसाठी लढा दिला तसेच कायद्याच्या दृष्टीने सर्व भारतीय नागरिकांना न्याय देण्यावर भर पंचशिल ध्वजारोहन व बुध्द वंदना, व्याख्यान, मिरवणूक सोहळा, सत्कार समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. 

कार्यक्रम स्थळी व मिरवणुकी दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
वणीत महामानवाला वंदन करण्यासाठी उसळला जनसागर वणीत महामानवाला वंदन करण्यासाठी उसळला जनसागर Reviewed by सह्याद्री चौफेर on April 16, 2025 Rating: 5
Powered by Blogger.