सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
राजूर कॉलरी : डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती येथील ग्रामपंचायतीचे वतीने साजरी करण्यात आली. या जयंती कार्यक्रमाला बाबासाहेबांचे विचार व कार्य गावकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्याख्यान ठेवण्यात आले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण संघर्ष हा या देशातील वंचित, पीडित जनतेचा उद्धारासाठी होता, हे सर्व करीत असताना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय स्वातंत्र्यासाठी ते आग्रही होते. त्यासाठी भारतीय राज्यघटनेचा पाया हा राज्य समाजवादी असावा त्याकरिता संविधानसभेला दिलेल्या मसुदेत त्यांनी मांडला होता. (तो मसुदा आज "स्टेट अँड मायनॉरिटीस" ह्या ग्रंथाचा रूपाने उपलब्ध आहे.) परंतु संविधान सभेत तो मान्य न झाल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान अर्पण करताना इशारा दिला होता की, "सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्याशिवाय वंचित जनता मोठ्या कष्टाने प्राप्त झालेल्या स्वातंत्र्याला इजा पोचवू शकतील." आज आपल्या देशात जातीवाद आणि आर्थिक विषमतेने, शेतकरी, कामगार, बेरोजगारीने त्रस्त युवक आंदोलनरत आहे तर दुसरीकडे झुंडशाही वाढत असल्याने बाबासाहेबांचा इशारा सत्यात उतरतो की काय असे वाटायला लागले आहे, त्यामुळे सामाजिक व आर्थिक विषमता देशासाठी घातक असल्याचे मत कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांनी व्यक्त केले.
यावेळेस प्रमुख वक्त्या पीएचडी स्कॉलर पल्लवी जगदीश दारुंडे यांनी व्यक्त होत असताना सांगितले की, "देशाचा आर्थिक विकास साधायचा असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेने कृषी, रोजगार, महिला सक्षमीकरण, शिक्षण यावर भर दिला पाहिजे, कारण सामाजिक विषमतेची पाळेमुळे ग्रामीण भागात जास्त खोलवर रुजलेली असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेने सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी विशेष अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थेत प्राप्त करून दिल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून महिलांनी त्याचा उपयोग सामाजिक व आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन प्रमुख वक्त्या पल्लवी दारुंडे यांनी केले.
माजी पंचायत समिती सदस्य अशोकभाऊ वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी व पीएचडी स्कॉलर सौ.पल्लवी जगदीश दारुंडे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच विद्याताई डेव्हिड पेरकावार, पोलिस पाटील वामन बलकी, वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजस आस्वले, तलाठी सुनील कोरडे, ग्रापं अधिकारी पुरुषोत्तम फुलझेले, जि.प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेश निरे, ग्रापं सदस्य दीपाली सातपुते, वंदना देवतळे, मंजुषा सिडाम, चेतना पाटील, सुचिता पाटील, पायल डवरे उपस्थित होते.
या कार्यक्रमात सर्वप्रथम भारतरत्न प पू बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अध्यक्ष अशोकभाऊ वानखेडे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
कार्यक्रमाला गावातील अनेक स्त्री पुरुष नागरिक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी व कर्मचारी, जिप शाळा शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर ताई यासोबत प्रामुख्याने वसंत पाटील, डेव्हिड पेरकावार, ॲड. अरविंद सिडाम, अनिल डवरे, सावन पाटील, सुनीता कुंभारे, गोवर्धन दुर्योधन, शंकर हिकरे, समन्ना कोंकटवार, श्रावण धोटे, प्रमोद ठमके, संजय पिसे, शंभरकर, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार जगदीश दारुंडे यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी सुमित खोब्रागडे, सुलतानभाई व रखमाबाई यांनी अथक परिश्रम घेतले.
सामाजिक व आर्थिक विषमता देशासाठी घातक - कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 16, 2025
Rating: