टॉप बातम्या

तलाठ्याच्या गाडीची तोडफोड, पोलिसात तक्रार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : तालुक्यातील तलाठी कुणाल निलकंठ आडे यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली असून, या प्रकरणी तलाठी आडे यांनी पोलिसात तक्रार नोंद करून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही खळबळजनक घटना 27 एप्रिल च्या मध्यरात्री विठ्ठलवाडीत घडली. 

सावर्ला साजातील तलाठी कुणाल आडे (35) यांची टाटा पंच कार क्र. (MH-29,BV-4662) ही विठ्ठलवाडी येथील घरासमोर उभी असतांना दगड मारुन कारचे 30,000/- रुपयाचे नुकसान केले आहे. फिर्यादी कुणाल आडे यांच्या जबानी रिपोर्ट वरुन अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 329 (3), 125,324(2),3(5) BNS नुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास सफौ सुरेद्र टोंगे पो. स्टे. वणी करत आहे.


Previous Post Next Post