सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : आदिवासी बहुल तालुका म्हणून मारेगाव तालुक्याची ओळख आहे. त्यामुळे नागरिकांचा निर्देशांक वाढविण्यासाठी शासन सन 2010 पासून मानव विकास मिशन अंतर्गत मानवाच्या कल्याणासाठी विविध योजना राबवीत आहे.
मात्र, प्रशासनाच्या उदासिनतेमुळे या अभियानाला राबवूनही त्याचे फलीत दिसून येत नाही. पूर्वीपेक्षा नागरिकांचे दरडोई उत्पन्न कमी झाले आहे. वेळेवर उपचार मिळत नसल्याने सुविधा अभावी अनेक नागरिकांना आपले जीव गमवावे लागत आहे. आरोग्यासोबत शिक्षणाचीही प्रश्न गंभीर आहे. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी आहेत पण शासनाकडे शिक्षण देण्यासाठी शिक्षक नाहीत. त्यामुळे अनेक शाळा विना शिक्षकाच्या असुन काही शाळा पट संख्येचे कारण पुढे करून बंद करण्यात आल्या आहेत.
यामुळे दोन्ही कारणाने ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असताना दिसत आहेत. यासोबतच महिलांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर रित्या दिसत असुन गर्भवती महिलांची तपासणी वेळोवेळी होताना दिसून येत नाही. जोखमीच्या माताकडेही दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. मिशन अंतर्गत तपासणी केली जात नसून त्यांना मोफत औषधी पुरवठाही केला जात नाही. ग्रामीण रुग्णालयासह आरोग्य केंद्र व उपकेंद्र अंतर्गत रुग्णांना आरोग्य सेवा वेळेत पुरविण्यात येत नाही.
मारेगाव तालुक्यात आत्महत्यचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत आहे. बेरोजगारी डोकं वर काढत आहे. यासोबतच कमिशन कमावण्याच्या नादात गावागावातील विकास कामाचा बोजवारा उडालेला आहे. त्यामुळे मानव विकास मिशनाच्या कामाकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मानव विकास मिशनचा निर्देशांक खालावला
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 17, 2025
Rating: