सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शहरात घरफोडीच्या सतत घटना घडत असून, लक्ष्मी नगर येथे चोरट्यांनी तब्बल चार लाखांचा वर ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील लक्ष्मी नगर येथील नांदेपेरा रोड परिसरातील सदनिका बंद असताना चोरट्यांनी कडी-कोयंडाचा स्क्रू काढून घरातील 4 लाख 13 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी सौ. सोनू रवींद्र बरडे यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे.
यामध्ये महागड्या सोन्याचे गोप, अंगठ्या, जिवती, मंगळसूत्र, कानातले, बारीक रिंग, चांदीचे चाळ, चांदीचे छल्ला, चांदीचा करदोळा असे विविध दागिणे होते. ही चोरी अज्ञात चोरांनी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार आज दि. 28 एप्रिल ला सोमवारी 12 ते पहाटे 5 च्या सुमारास घडला. त्याआधारे वणी पोलिस तपास करत आहेत.
वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत लक्ष्मी नगर मधील बंद सदनिका फोडून चोरट्यांनी सोन्याचे सोन्या चांदीचे दागिने, असा एकूण 4,13,500 रु.चा ऐवज चोरून नेला. हा खळबळजनक प्रकार सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडला असून, पुढील तपास पो उपनि धिरज गुल्हाणे करत आहेत.
वणीत पुन्हा चोरट्यांचा धुडगूस, 4 लाखांचे वर दागिणे लंपास
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 28, 2025
Rating: