घरकुल, इतर बांधकाम रखडले, मनसेचे तहसीलदारांना निवेदन

सह्याद्री चौफेर | योगेश मडावी

झरी : जिल्ह्यातील कोणत्याही रेती घाटाचा अध्याप लिलाव झाला नसल्याने घरकुल लाभार्थ्यांची बांधकाम रखडलेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने घरकुल लाभार्थ्यांना मोफत ऑफलाईन पद्धतीने रेती उपलब्ध करून द्यावी तसेच इतर बांधकामे रेती अभावी रखडले असल्याकारणाने त्यांना सुद्धा रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना झरी तालुक्याच्या वतीने  तहसीलदारांना केली आहे. 

झरी तालुक्यामध्ये शासनातर्फे आर्थिक दुर्बल कुटुंब, शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री आवास, रमाई, शबरी घरकुल योजना मंजूर झाली असून लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता अंदाजे १५००० हजार रुपये रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आहे, तसेच शासन निर्देशाने लवकरात लवकर घरकुल बांधकाम सुरू करावे असे आदेश सुद्धा काढण्यात आले आहे. 

घरकुल बांधकामासाठी सर्वात महत्त्वाचा विषय असलेला एक भाग म्हणजे रेती, झरी तालुक्यामध्ये कोणताही रेती घाट लिलाव झाला नसल्याने कुठेच रेती मिळत नसून याच संधीचा फायदा घेवून रेती तस्कर ज्यादा दराने मोठी रक्कम आकारून रेती देत आहेत, वाढत्या महागाई मुळे घर बांधकाम करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने मोफत किंवा गाडी भाडे व मजुरी आकारून रेती उपलब्ध करून द्यावी तसेच ही रेती देताना घरकुल यादीतील क्रमवारीने तसेच ऑफलाईन पद्धतीने द्यावी कारण अनेक लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आपण ही रेती देताना ऑफलाईन पद्धतीचा वापर करावा जेणेकरून या लाभार्थ्यांना ते सोयीचे होईल. यासह शहरातील अनेक नागरिकांनी आपलं स्वतःचा हक्काचं घर असाव यासाठी घराची बांधकाम चालू केले मात्र रेती अभावी ही कामे सुद्धा पूर्णता रखडलेली आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई करून घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक प्रविण लेनगुळे, विठ्ठल बोथाडे, चेतन हेपट, नागोराव आत्राम, दिनेश दरेकर ,लोकेश डहाके, दिलीप डहाके, दादाजी कलमाळे, गजानन गौरकार, गजानन राऊत,विश्वनाथ गजलवार, कुंडलिक राऊत, कवडू ढोके, पंडित शिरसागर, गिरीधर ठमके यांच्यासह तालुक्यातील अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते..
घरकुल, इतर बांधकाम रखडले, मनसेचे तहसीलदारांना निवेदन घरकुल, इतर बांधकाम रखडले, मनसेचे तहसीलदारांना निवेदन Reviewed by सह्याद्री चौफेर on April 28, 2025 Rating: 5
Powered by Blogger.