सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : सन १९९२-९३ ला दहावीत पंचशिल हायस्कुल नांदेपेरा येथे एकत्र शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमिलनाचा कार्यक्रम मागील वर्षी वनोजा देवी येथे घेण्यात आला होता. व त्या मध्ये काही विद्यार्थी अपरिहार्य कारणामुळे येवू शकले नव्हते, त्यामुळे त्यांना सुध्दा भेटने आवश्यकच असल्यामुळे यावर्षी श्री गजानन महाराज मंदीर, जैताई नगर, वणी येथे दिनांक ०९/०३/२०२५ रोज रविवारला स्नेहमिलनाचा कार्यक्रम पार पाडला. विशेष म्हणजे या स्नेहसंम्मेलनाच्या कार्यक्रमात मागील वर्षी आलेले व जे विद्यार्थी मागील वर्षी नव्हते ते सुध्दा आलेले दिसून येते. त्यामुळे कार्यक्रमाला चांगलीच रंगत आली होती.
पंचशिल हास्कुल नांदेपेरा येथे सन १९९२-९३ मध्ये १० वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या या वर्गमीत्रांची भेट झाल्याने सर्वांनी आपला जिवन परीचय देत विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेतले. त्यामध्ये विविध प्रकारचे खेळ लहानपणीचे खेळ्यात आले. खेळा मध्ये सर्वांनी सहभाग घेतला, तसेच काहींनी गाने म्हणून मनोरंजन केले, व काहींनी जुन्या आठवणी काढून लहानपण जागे केले. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री. क्षिरसागर सर होते व प्रमुख पाहुने श्री. श्रध्दानंद हेपट व सौ बोढेताई उपस्थित होत्या यावेळी पाहुन्यांनी मार्गदर्शन केले व हा एक आदर्श वर्ग असल्याचे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन कु. छाया केळकर हीने व प्रास्तावीक भाषण श्री. हरी आनंदराव आसुटकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन सौ. भाग्यश्री ठावरी हीने केले.
गेट टु गेदर कार्यक्रमाला सौ. वैशाली श्रध्दानंद हेपट, श्री. किशोर हेपट, श्री. वियज शेडामे, श्री. राजु दुमोरे, श्री. कवड्डु माथनकर यांनी व उपस्थित सर्वानी विशेष परिश्रम घेतले.ह्या प्रकारे ३२ वर्षानंतर दोनदा कार्यक्रम पार पाडून आर्दश निर्माण केला.
३२ वर्षानंतर इयता १० वीतील वर्गमीत्र दोनदा आले एकत्र
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 12, 2025
Rating: