उपसरपंच यांच्या प्रयत्नाला यश, वन हक्क पट्टे धारकांना पिमएम किसान निधीचा मिळवून दिला लाभ!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : पंचायत समिती,वणी अंतर्गत येत असलेल्या ग्रा. पं मोहदा येथील उपसरपंच सचिन रासेकर यांच्या प्रयत्नामुळे २५ शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने वनहक्क पट्टे बहाल करण्यात आले. शेतकऱ्यांना अधिकार प्राप्त झाला. परंतु या शेतकऱ्यांना अतिवृष्टी, अवर्षण, कीड व रोगामुळे झालेल्या हानीची नुकसानभरपाई मिळण्यास प्रशासनाकडून अडचणी येत होत्या. तसेच शासनाच्या पंतप्रधान पिक विमा योजना, पी.एम. किसान सम्मान निधी योजना, नमो शेतकरी महासम्मान निधी योजना व २०२३ खरीप कापूस सोयाबीन अर्थसाहाय्य अनुदान योजना ह्या शेतकरी या नात्याने अक्षरशः अन्याय होत असताना मात्र उपसरपंच सचिन रासेकर यांनी पाठपुरावाकरून सदर शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी चा १९ वा हप्ता मिळवून देण्यात मोठं यश आले आहे. त्यांच्या या प्रयत्नाचे सर्व शेतकरी बांधवाकडून आभार मानन्यात येत आहे. 

विशेष उल्लेखनीय की, ग्रामपंचायत मोहदा येथील उपसरपंच सचिन रासेकर नेहमीच सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न उचलून प्रशासन दरबारी रेटत असतात. मग निराधार, दिव्यांग, घरकुल लाभार्थी, शेतकरी-शेतमजूर असो की, आदिवासिंचे प्रश्न असो. ते आजतागायत सतत पाठपुरावा करून सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात. आताही उपसरपंच रासेकर यांनी बहुप्रतीक्षेत असलेल्या वनहक्क पट्टेधारकांना शासनाचा पी एम किसान सन्मान निधी मिळवून देण्यासाठी संबंधित विभागाला पाठपुरावा केला आणि त्यांना पी एम किसान सन्मान निधीचा लाभ मिळवून दिला आहे. उपसरपंच यांच्या प्रयत्नाला यश आले असून उपसरपंच सचिन रासेकर यांनी प्रशासनाचे आभार मानलेत. 
उपसरपंच यांच्या प्रयत्नाला यश, वन हक्क पट्टे धारकांना पिमएम किसान निधीचा मिळवून दिला लाभ! उपसरपंच यांच्या प्रयत्नाला यश, वन हक्क पट्टे धारकांना पिमएम किसान निधीचा मिळवून दिला लाभ! Reviewed by सह्याद्री चौफेर on March 12, 2025 Rating: 5
Powered by Blogger.