सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी शहरात भटक्या कुत्र्याने हल्ला केला. यात 9 वर्षाचा बालक जखमी झाला आहे. श्रीतीज श्रीकांत कालर असं त्याचं नाव असून त्याचेवर चंद्रपूर येथे उपचार सुरु असल्याचे समजते. ह्याच घटनेचा पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याचा समाजमाध्यमावर व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला आहे.
व्हिडीओ मध्ये बालक सायकल घेऊन फिरत आहे, अशातच नागरिक सुद्धा येजा करत आहे. बालक हा सोसायटीच्या खुल्या जागेत सायकल चालवत असताना कुत्र्याने त्याचेवर अचानक हल्ला केला. आरडाओरड झाल्याने नागरिक बाहेर पडले. बघतेय तर काय कुत्रा एका बालकांवर हल्ला करतांना दिसला आहे. नागरिकांनी त्या कुत्र्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यात जखमी झालेल्या बालकाने देखील हिम्मत दाखवत कुत्र्यापासून सुटका करण्याचा प्रयत्न केला असं, विडिओत दिसून येतं. समोरील दारातून महिला बाहेर आल्याने कुत्रा पळाला. हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला.
मात्र, यादरम्यान झटापटीत बालक जखमी झाला आहे. त्याचेवर चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना सदाशिव नगर येथे मंगळवारी 11 मार्च रोजी सायंकाळी 6.45 च्या सुमारास समोर आली असून समाजमाध्यमातून व्हिडीओ वायरल होताच या घटनेने शहरात संताप व्यक्त होत असून नगर परिषद काय पाऊल उचलतात याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे.
वणीमध्ये चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याचा हल्ला
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 13, 2025
Rating: