खैरी अपघातातील दुचाकीस्वार चेतन आय सी यू मध्ये भरती

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

राळेगाव : खैरी येथील टर्निंगवर एका भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीस्वाराला उडवले, यात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरु आहे. सदर घटना ९ मार्च रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान, घडली होती. 

चेतन कवडू माथनकर (वय २७) रा.बोरी (बु.) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. मोटरसायकल क्र.एम.एच.२९ ए.जे. ८१६२ ने चेतन खैरीकडुन माढाळीकडे जात असतांना माढेळी मार्गे येत असलेले स्विफ्ट कार (क्र.एम.एच.२९ बि.पी.१४२६) या गाडीने खैरीकडे येत असतांना खैरी गावाच्या टर्निंग नमूद कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली, यात दुचाकीस्वारच्या डोक्यात गंभीर इजा झाल्याने त्याच्यावर नागपुरात उपचार सुरु आहे. विशेष उल्लेखनीय की, ज्यावेळी हा अपघात घडला त्यावेळी त्याने अपघातग्रस्ताला माणुसकी न दाखवता किंबहुना दवाखान्यात न नेता घटनास्थळावरून पळ काढला, असं प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. दरम्यान घटनास्थळावर अपघातग्रस्त व्यक्ती हा अर्धतास पडून असल्याने खुप रक्तस्त्राव झाला असं समजत. तो तीन दिवसापासून आयसी यू मध्ये असून नागपूर येथील न्युरोन हास्पिटलमध्ये त्याचेवर उपचार सुरु आहे.

दरम्यान, सदर घटनेची माहिती वडकी पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांना मिळताच त्यांनी खैरी बिट जमादार अविनाश चिकराम व आकाश कुंदुसे यांना तातडीने घटनास्थळी पाचरण करून घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास वडकी पोलीस करीत आहे.
खैरी अपघातातील दुचाकीस्वार चेतन आय सी यू मध्ये भरती खैरी अपघातातील दुचाकीस्वार चेतन आय सी यू मध्ये भरती Reviewed by सह्याद्री चौफेर on March 11, 2025 Rating: 5
Powered by Blogger.