सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
सामाजिक कार्यकर्ते गजानन चंदनखेडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यात तत्काळ सुधारणा करावी आणि कराची मूळ पावती प्रत नागरिकांना देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. मात्र,कर भरल्यानंतर, मूळ पावतीकडे दुर्लक्ष करून नगर पंचायत प्रशासन लाभार्थ्यांना कार्बन कॉपी देत आहे. या प्रकारची फसवणूक गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू असल्याचा ठपका लगावला आहे. दरम्यान, प्रशासनावर संतापही व्यक्त केला जात आहे. परिणामी मुख्याधिकाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक ह्यांची भूमिका निष्प्रभ ठरत आहे. त्यामुळे त्रासलेल्या नागरिकांकडून प्रशासनाला दोष दिला जात आहे.
त्यामुळे त्यात त्वरित सुधारणा करून कराची मूळ पावती प्रत नागरिकांना देण्यात यावी, असे न झाल्यास नगर पंचायत कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
मूळ कर पावती त्वरित द्या,सामाजिक कार्यकर्ते गजानन चंदनखेडेंचे प्रशासनाला निवेदन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 11, 2025
Rating: