खैरगाव येथे भव्य शंकरपट

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्यातील खैरगाव येथे भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. वणी शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ता अ‍ॅड. कुणाल चोरडिया यांच्या हस्ते सोमवारी 24 मार्च ला दुपारी 2:30 वाजता शंकरपटाचे उद्घाटन करण्यात आले. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गावचे सरपंच तुळशिराम कुमरे होते.

यावेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार, माजी मुख्याध्यापक तुळशिराम पेंदोर, ग्रामसेवक जनबंधू, पोलिस पाटील सौ मालाबाई कुमरे, गंगाधर आत्राम, सुनील गोवारदिपे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

शेतकऱ्यांच्या विशेष आवडीची असलेली ही बैलगाडीची शर्यत आहे. यानिमित्ताने तब्बल एक लाख आठ हजाराच्या बक्षिसांची लयलूट करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
खैरगाव येथे भव्य शंकरपट खैरगाव येथे भव्य शंकरपट Reviewed by सह्याद्री चौफेर on March 25, 2025 Rating: 5
Powered by Blogger.