सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शेतकरी लाॅन वणी येथे दिनांक 22 मार्च ला विदर्भाच्या मातीतील नृत्यकलावंताच्या सुप्त कलागुणाना वाव देण्यासाठी मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्ता सौ. मनिषाताई सुरेंद्र निब्रड याच्या प्रमुख आयोजनात विदर्भ स्तरीय राजे नृत्य स्पर्धा संपन्न झाली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन किरणताई देरकर याच्या हस्ते झाले तर अध्यक्ष म्हणून आशिष खुलसंगे अध्यक्ष वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून अडव्होकेट देविदास काळे, प्रमोद वासेकर, अडव्होकेट पौर्णिमा शिरभाते, माधव सरपटवार, वंदना आवारी, साधना गोहोकार, शारदा ठाकरे इत्यादीची उपस्थिती होती.
या प्रसंगी आयोजक दाम्पत्य सुरेंद्र निब्रड, मनिषा सुरेंद्र निब्रड यांच्या या कामगिरीबद्दल प्रयास व क्रांतीजोती फेडरेशन च्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
स्पर्धेत विदर्भातून नागपूर, चंद्रपूर,वरोरा, भंडारा यवतमाळ, वाशिम, उमरखेड, गोंदीया व स्थानिक परिसरातील स्पर्धकानी या स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विदर्भ स्तरीय नृत्यस्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 25, 2025
Rating: