सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील एका गावकऱ्याला वाघ दिसला. तो पाहताच त्याचा थरकाप सुटला. त्याने याची माहिती गावकऱ्यांना दिली. गावकऱ्यांनी लागलीच ती माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. वनविभागाची चमू त्याठिकाणी शोध घेत असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
मारेगाव तालुक्यातील दांडगाव जुना रिठावर आज सकाळी विशाल सुभाष भुसारी या शेतकऱ्याला वाघ दिसला. त्याने होमगार्ड नरेंद्र गजानन चिंचोलकर यांना गावात येऊन वाघ असल्याचे सांगितले, त्या दोघांनी जावून वाघाच्या पायाचे ठसे मोबाईल मध्ये टिपले, वाघ जुन्या गावात असल्याने गावकऱ्यांचा चांगलाच थरकाप उडाला आहे.
दांडगाव शेतशिवारात भला मोठा पट्टेदार वाघ दिसला. वाघ पाहताच त्यांना थरकाप सुटला. तो वाघ गावाच्या जुना रिठ वर असल्याची माहिती त्यांनी मोबाईल वरून लगेच वनविभागाला कळविले असता वनविभागाची चमू दांडगाव परिसर व ज्या ठिकाणी वाघ गावाकऱ्यांनी पाहला त्या ठिकाणसह इतरही भागात त्याचा शोध घेत आहे. अशी माहिती गावाकऱ्यांसह वनविभागाच्या टीमने दिली.
विशेष म्हणजे,जंगलात भटकणारा वाघ आता शेत शिवार व गावाच्या जवळपास भटकत असल्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत टीम ला विचारणा केली असता वाघ नसून वाघीण आहे, ती पाण्याच्या शोधात आली असावी. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. वरिष्ठाना कळवून वाघीण चा शोध घेतला जात आहे.त्यामुळे दांडगाव परिसरात वाघ असल्याचे मात्र कन्फर्म झाले.
दांडगाव गावाच्या जुन्या रिठावर वाघाचे ठसे व दर्शन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 25, 2025
Rating: