वणी येथील शिवतीर्थावर तरुणांचे आमरण उपोषण

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : झरी जामणी तालुक्यातील अडेगांव येथील काही तरूणांनी सोमवार दि.24 मार्च पासून आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. 

हिरापुर बिटच्या वनरक्षकाला निलंबित करा या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ या तरूणांनी सोमवार पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली असून आज उपोषणाचा तिसरा दिवस उजाडला तरी यावर तोडगा निघाला नाही.

2 मार्च 2025 रोजी रात्री महिला वनरक्षक हिरापूर बिट यांनी वनविभागाच्या हद्दित नसतांना अवैधरित्या रेतीचा ट्रॅक्टर पकडून 40 हजार रुपये बळजबरीने वसुल करीत वनमजुर व वनरक्षकाचा भाऊ यांनी लाठी काठीचा धाक दाखवून व अश्लील भाषेत शिवीगाळ करून पैसे देण्यास भाग पाडले. 

या बाबतची तक्रार सहाय्यक वनरक्षक वणी यांच्याकडे महिला वनरक्षकाला निलंबित करा व दोन्ही वन मजूरांसह संबंधित भावावर कारवाई करण्यात यावी,अशा प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, त्यांचेवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे अखेर वनविभागाचे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली.
वणी येथील शिवतीर्थावर तरुणांचे आमरण उपोषण वणी येथील शिवतीर्थावर तरुणांचे आमरण उपोषण Reviewed by सह्याद्री चौफेर on March 26, 2025 Rating: 5
Powered by Blogger.