सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : पोलीस स्टेशन वणी अंतर्गत सादर करण्यात आलेल्या यादीतील एकूण 126 बेवारस मोटार वाहनांचा उपविभागीय दंडाधिकारी वणी यांचे आदेश क्रमांकः महसूल सहायत/उपविभागीय दंडाधिकारी/गृहशाखा/2025 अन्वये पोलीस स्टेशन वणी येथील दिनांक 25/03/2025 रोजी 12.00 वाजता पासुन नियमाप्रमाणे लिलाव करण्यात येत आहे.
सर्व नागरीकांना आव्हान करण्यात येते की, दिनांक 25/03/2025 पुर्वी कोणास काही मालकी हक्क सांगावयाचा असेल त्यांनी तत्काळ पोलीस स्टेशन वणी येथे वाहनाचे मूळ कागदोपत्री दस्तऐवजासह यावे. जर मुदतीत कोणीही योग्य हरकती न दाखविल्यास बेवारस वाहनांचा नियमाप्रमाणे लिलाव करण्यात येईल, तद्नंतर कोणतेही आक्षेप हरकत नोंद घेण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. अशी माहिती पोलीस स्टेशन वणी यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली.
पोलीस स्टेशन वणी येथील एकुण 123 बेवारस वाहनांचा लिलाव
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 24, 2025
Rating: