सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव तालुक्यातील पार्डी लगत असलेल्या वर्धा नदीपात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळला.याबाबत पार्डी येथील पोलीस पाटील बदखल यांनी मारेगाव पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
मारेगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पाऊले उचलली. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आणि पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृतकाचे अंदाजे 30 ते 40 वय असून वृत्तलिहेपर्यंत मृतदेहाची ओळख पटली नव्हती.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुधाकर गावंडे यांच्यासह शंकर बारेकर हे अधिक तपास करीत आहे.
वर्धा नदी पात्रात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 24, 2025
Rating: