सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने मोटरसायकल चालकाला बेधडक दिली. या अपघातात दोन युवक गंभीर झाल्याची घटना दि. 29 मार्च रोजी सायंकाळी 6.15 वाजता राज्य महामार्गावरील घोगुलदरा फाट्यानजीक घडली. दरम्यान दूचाकीस्वाराला अक्षरशः चारशे मिटर फरफटत नेत कारवाला पसार झाला.
वणी-मारेगाव वरून भरधाव करंजी दिशेने हे अज्ञात वाहन जात होते. याच दिशेने दुचाकीस्वार मारेगाव तालुक्यातील वाघदरा येथील सतीश झिगूं आत्राम व निलेश तुकाराम दडांजे हे जात असतांना राज्यमहामार्गांवर असलेल्या घोगुलदरा फाट्या पासून अज्ञात कार ने अक्षरशः दुचाकीला फरफटत तब्बल तीनशे ते चारशे मिटर वरील बोटोणी नजीक सराटी फाट्यापर्यंत नेले. हा थरार येथील अनेकांनी प्रत्यक्षात बघीतला. येथे गतिरोधक असल्याने दुचाकी कडेला पडली यात दुचाकीस्वार दोघेही गंभीररित्या जखमी झाले. मात्र, हे अज्ञात वाहन धारकांनी वाहणासह घटनास्थळावरून पोबारा केला.
गंभीर जखमी दुचाकीस्वार सतीश व निलेश यांना करंजी येथील प्राथमिक उपचार करून यवतमाळ येथे हलविण्यात आले. घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.
अपघातात दोघे गंभीर जखमी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 30, 2025
Rating: