टॉप बातम्या

मांडोस निमित्त गोंड पंच कमिटी माथार्जुन गोणा बैठक संपन्न

सह्याद्री चौफेर | योगेश मडावी 

झरी जामणी : आदिवासी बहुल असलेल्या तालुक्यामधील माथार्जुन या गावामध्ये पारंपारिक गोंड पंच कमिटी यांची सभा पिढीन पिढी चालवत येत असलेले या परंपरा आपल्या पिढीसमोर आदर्श ठेवण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली.

महत्त्वाचं म्हणजे गोंड पंच कमिटी मध्ये एक न्याय करते म्हणून चार लोक निवडले जातात त्यामध्ये घटया महाजन कारभारी व भूमक यांचे कार्य समाजामध्ये वादविवाद असल्यास एक गोणा बैठकीमधून निर्णय लावण्यात येते. सांस्कृतिक,लग्न,समारंभ देव कार्य मृत्यक कार्य व देवकार यांच्या समक्ष केल्या जातात..समाजाचे संपूर्ण कार्य हे पंच कमेटीनुसार करण्यात येतो.

पारंपारिक चालत येत असलेल्या गोंड पंच कमेटी गोंड समुदायाच्या लोकांमधून लोकशाही पद्धतीने घटया, महाजन, कारभारी व भूमक निवडण्यात येते.
 
पारंपारिक रूढी परंपरानुसार चालत येत असलेल्या माथार्जुन येथे घटया पदी संतोष तुमराम. महाजन पदी मनोहर मेश्राम,कारभारी पदी अरविंद नैताम, तर भूमक या पदी धर्मा गेडाम, यांची गोंड पंच कमेटी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
Previous Post Next Post