गुढी आनंदाची
सण आला हा पाडव्याचा
घेऊन नवचैतन्य उत्साहाचा
ध्यास असू द्या मनी प्रेमाचा
आनंद हा नववर्षाचा,
फुलवा नात्यांचा गोडवा
द्वेष मत्सराची गुंतागुंत सोडवा
गुढी उभारा मनी प्रेमाची
जणू पालवीच्या नवपर्णाची,
आसमंत गेला भरुनी
वसंताच्या निर्मळ स्पर्शाने
हिरवळ परिमळ झाली सृष्टी पशुपक्ष्यांची कोमलदृष्टी,
कलारव किलबिलांचे गुंजन
गगन गेले सप्तसुरांनी रंगून
जीवनी तुमच्या आनंद वसु दे
हीच सदिच्छा मनी असू दे.
- मंजुषा राजेंद्रप्रसाद पांडे
गुढी आनंदाची....
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 30, 2025
Rating: