थोडा तरी वेळ काढ सखी थोडा तरी वेळ काढ ग.....
या धकाधकीच्या जीवनातून थोडा तरी वेळ काढ ग.....
तू आहेस एक स्त्री,आई,मुलगी, बहीण, बायको, आजी, नातीन.....
पण थोडा स्वतःसाठी वेळ काढ ग ही सगळी नाती जपून थोडा तरी वेळ काढ सुख दुख तर येतील जातील.....
लहान होतीस तर बागडायचिस खेळायचीस.....
थोडी मोठी झाली तर शाळा कॉलेज अभ्यास यात रमायचीस.....
वयात आली लग्नाच्या तर घरच्यांनी केले तुझे पिवळे हात.....
कारण तुला जायचं होतं परक्या घरी कुणाला तरी तुला द्यायची होती साथ.....
लहानाची मोठी झाली शिक्षण घेऊन मुलगी झाली.....
शिक्षण झाल्यावर लग्न झाले कुणाची तरी बायको झाली.....
बायको सून म्हणून कर्तव्य निभावत होतीसच.....
तर वेळ आली आई व्हायची वेळ आली आई व्हायची....
तू नारायणी तू अष्टभुजा तूच तुझा परिवाराची रणरागिणी......
खेळणारी बागडणारी झाली आता मोठी .....
प्रत्येक क्षणी भूमिका बदलत गेल्या ती झाली आता आई तुलाच सगळ करायच आहे हेच सांगे तिला सगळे हेच सगळ्यांच्या ओठी.....
आई म्हणून जगताना तिला आईच थोडी व्हायचे होते.....
तिला तर सुन बायको या सगळ्यांचे कर्तव्य निभावायचे होते.....
यात तिला वेळ कुठे स्वत साठी जगायला.....
तिला ही वाटे निघाव बाहेर या मोकळ्या आकाशाखाली आपले स्वप्न शोधायला.....
तिला ही वाटे आपल्या जुन्या मैत्रिणीला भेटायला.....
या सगळ्यात तिला हेच बोलणे की काय करतेस घरीच तर असतेस ते तू नाही तर कोण करेल काम तूच करशील.....
अरे पण एक दिवस जर ती सुट्टी वर गेली तर तुम्हा सगळ्याच जीवनच तर थांबेल कारण मित्रा असे बोलून तू तिथे हरशील.....
नको तिला तुमचे धन द्रव्य नको तिला तुमची संपत्ती.....
तिला हवं थोड प्रेम थोडा तुमचा साथ थोडी प्रेमाची सिंपती.....
बोल थोड प्रेमाने मायेने फिरव प्रेमाचा हात.....
तिला ही वाटेल हवाहवा तुझा साथ.....
तुम्ही तिला बोलून देता टेन्शन त्यामुळे ती होती कुठल्या कुठल्या बिमारीची शिकार.....
कारण ती घेते या सगळ्यात मानसिक टेन्शन नसतो तिला त्यावेळेस मन मोकळ व्हायला आधार.....
म्हणून म्हणते सखी तूच बन तुझा आधार ......
घे हिसकावून स्वतःचा अधिकार.....
बन तू मजबूत तुझात आहे तितकी ताकद......
दाखव या समाजाला तूच आहेस तुझ्या जीवनाची शिल्पकार तूच घडवू शकते स्वतःला कमजोर नाही तू हाच ठेव तुझा मक्सद.....
नको जावू जीव देण्याच्या आहारी......
खूप काही आहे ग तुझ्या माघारी .....
तूच सांभाळू शकते सगळ.....
तू नसलीस तर काही नाही जी सगळच झालं समज विस्कळीत मोकळ.....
हो मोकळी तू आता गेली ती दाबून राहायची वेळ.....
जग स्वतःसाठी आता तरी सखी काढ थोडा वेळ.....
-सौ.स्नेहा प्रवीण नागतुरे
(कु .स्नेहा अरुण नक्षणे)
जागतिक महिला दिनाच्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना मनापासून शुभेच्छा.....
जागतिक महिला दिन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 09, 2025
Rating: