टॉप बातम्या

मानकीमधील 'शो' अचानक रद्द करण्यात आला

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची सौर्यगाथा सांगणारा चित्रपट शनिवारी मानकी गावातील नागरिकांना पाहता यावा यासाठी येथील 'मित्र परिवार' यांच्या तर्फे आज शनिवारी सायंकाळी 8 वा.मोफत पाहण्याचे आयोजन जि. प शाळेत केले असता 'शो' सुरू होण्याच्या नियोजित वेळेच्या काही वेळापूर्वीच काही कारणास्तव शो रद्द करण्यात आला. याबाबत आयोजकांनी, शो पाहता येणार नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच छत्रपती संभाजी महाराज हे देखील आपलं दैवत आहे. धर्मासाठी त्यांनी आपलं बलिदान देऊन एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे. त्यांच्या जीवनावर आधारित 'छावा' सिनेमा हा प्रत्येकाने पाहिलाच पाहिजे. मात्र, मानकी येथील आजचा आयोजित शो रद्द करण्यात आल्याने गावाकऱ्यात निरुत्साह जाणवतो आहे. 
Previous Post Next Post