आनंदाची बातमी! ‘छावा’ चित्रपट मानकी गावातील नागरिकांना मोफत पाहता येणार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारीला संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला.या सिनेमात बॉलीवूड अभिनेता विकी कौशल यांनी प्रमुख भूमिका साकारली असून, दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना ‘छावा’ मध्ये महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत झळकत आहे.

सध्या सर्वत्र या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू असून, अनेक ठिकाणी ‘छावा’चे शो हाऊसफुल सुरू आहेत. याचदरम्यान मानकी येथिल "मित्र परिवार" यांनी गावात मोफत चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. आज दि.8 मार्च रोजी सायंकाळी 8 वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल शाळा मानकी येथे गावातील व परिसरातील नागरिकांना मोफत सिनेमा पाहता येणार आहे.

"मित्र परिवार" यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरित्रातून प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी; यासाठी छावा सिनेमा गावातील नागरिकांना मोफत दाखविण्याचा संकल्प केला आहे.

“छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच छत्रपती संभाजी महाराज हे देखील आपलं दैवत आहे. धर्मासाठी त्यांनी आपलं बलिदान देऊन एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे.त्यांच्या जीवनावर आधारित छावा सिनेमा हा प्रत्येकाने पाहिलाच पाहिजे. त्यामुळे मानकी गावातील नागरिकांना छावा सिनेमा मोफत दाखविण्याचा प्रयत्न आहे.” अशी भावना "मित्र परिवार मानकी" यांनी यावेळी व्यक्त केली.
आनंदाची बातमी! ‘छावा’ चित्रपट मानकी गावातील नागरिकांना मोफत पाहता येणार आनंदाची बातमी! ‘छावा’ चित्रपट मानकी गावातील नागरिकांना मोफत पाहता येणार Reviewed by सह्याद्री चौफेर on March 08, 2025 Rating: 5
Powered by Blogger.