सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील गोंडबुरांडा येथिल श्री दर्शन भारती विद्यालयातील सावित्री एकता मंच द्वारा दि.८ मार्च २०२५ शनिवार ला जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल आष्टकर सर होते प्रमुख मार्गदर्शका म्हणून प्रतिभा तातेड (सामाजिक कार्यकर्ता व महिला पत्रकार) तर प्रमुख पाहुणे सोनाली जेनेकर, गोदावरी जोशी, संजय मोघे, दिलीप तेलंग, विलास मेश्राम हे मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले नंतर पाहुण्याचा सत्कार समारंभ व सर्वांना आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
मंचावरिल उपस्थितांनी व विद्यालयातील ज्ञानेश्वरी गेडाम, तनवी गमे व श्रावणी किनाके या विद्यार्थ्यांनीनी महिला दिनावर आधारित आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन साक्षी सपाट हिने केले प्रास्ताविक, प्रगती पारखी तर आभारप्रदर्शन श्रावणी किनाके हिने केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी व शाळेतील नामदेव तोडासे (शिपाई) यांनी परिश्रम घेतले.
श्री दर्शन भारती विद्यालयात 'जागतिक महिला दिन' संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 08, 2025
Rating: