सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
शनिवार, ८ मार्च २०२५ आज जागतिक महिला दिनाची थिम "त्वरीत करा" ही आहे. महिलांवरील शारीरिक अन्यायाविरुद्ध शिक्षा सुनावणी व अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी या धरतीवर ही थिम ठरवण्यात आलेली आहे. दोन दशकांपुर्वी लेकीची भृणुहत्या टाळा म्हणत खपणार्या शासनापुढे फारच कमी काळात महिला सुरक्षेचे गंभिर आव्हान उभे ठाकले आहे.पुर्वी लेक भृणुअवस्थेत पोटात व आता समाजात ,काळ कोणताही असला तरी स्त्री व तिचे स्त्रीत्व धोक्याच्या उंबरठ्यावर उभे आहे हे नक्की. स्त्री देह पोसणे ,सुरक्षीत ठेवणे व त्यातील स्त्रीत्व जपणे हे हल्ली आव्हानच झाले आहे.ज्याप्रकारे अतिप्रमाणात रासायनिक खते वापरून जमिनीचा पोत खालावत चालला त्याचप्रमाणे स्त्री देहातील स्त्रीत्वही धोक्यात येत आहे.
सामाजिक,मानसिक, आर्थिक, वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांमुळे तरुण मुलींमधुन एक नवा व चुकीचा सुर जन्माला यायला लागला आहे.आम्हा मुलींत व मुलांत समानता आहे.तर आम्ही पुर्णतः मुलांसारखे अधिकार,वागणे बोलणे ठेवून जगणार म्हणत मुली मुलांसारखे जिन्स टिशर्ट,बाईक चालवणे, कोणत्याही प्रकारचे स्त्रीत्व दर्शक शृंगारिक दागिने न घालणे.मोठ्या डायलची मनगटी घड्याळे वापरणे , अर्वाच्य शिवराळ भाषा वापरणे, रात्रीबेरात्री बेधडकपणे बाहेर वावरणे ,डॅशिंग दिसावं ,म्हणजे कुणी पुरुष वाटेला जाणार नाही या भ्रमात जगत आहेत,.क्वचितदा पुरुषांकडुन एखाद्या वाईट अनुभव आलाच तर एकटीने आयुष्य काढायचा निर्णय घेणे.किंवा लग्नाप्रती निरसता बाळगणे.वगैरे वगैरे दुखावलेली स्त्री मानसिकता जन्माला येत आहे.
नवीन आयुष्य जन्माला चालणार्या मुलींच्या मनात स्वतः:घ्या आयुष्याप्रतीची ही नकारात्मकता समाजातील वातावरण कारणी तर आहेच, शिवाय मुलींची चुकीची जडणघडण ही तेवढीच जबाबदार आहे. नर,मादी असे भिन्न देह विधात्याने सृष्टीची रचना करण्याच्या हेतूनेच निर्माण केली आहे .मग आपण रचियेत्याच्या निर्मितीवर साशंक तर व्यक्त करत नाही ना? यावर मंथन व्हायला हवे. आणि मुलामुलींत समानताच ठेवायची आहे तर ती प्रेम ,अधिकार,मानसन्मान,यात असावी हे अपेक्षित आहे.मुलींनीच मुलांची बरोबरी का करावी ? मुलांनी मुलींची बरोबरी का करु नये? शाळा महाविद्यालयांत मुलींना मुलांच्या बरोबरीने न्याय देण्यासाठीचा उपाय म्हणून शर्ट पँट असा गणवेष असतो.प्रश्न जर बरोबरीचा आहे तर, मुलांना मुलींचा पेहराव का नसतो? इथे वैचारिक स्तब्धता येते.विधात्याची उलट चौकशी करणे असा हा मामला आहे.
जन्माला घातल्यानंतर मुलीला मुलीसारखे वाढवणे,तिच्यातील नैसर्गिक लज्जा,शृंगार,श्रध्दा,भक्ती या भावना न दडपता तिला खंबीरत्वाचे धडे देणे ही स्त्रीत्व जपताना काळाची गरज आहे..विरांगणा झाशीची राणी पुरुषी पराक्रम करताना पाठीशी मुलं बांधुन ममत्व जपते, राजमाता जिजाऊ शिवरायांना महाभारत,रामायणातील कथा सांगताना त्यांचा एक हात शिवरायांज्या पाठीवर तर दुसरा हात कमेरेतील समशेरीवर दिसतो.पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या हातात महादेवाची पिंड बघायला मिळते.यावरुन हे लक्षात येते पुरुषी क्षेत्रात भिमपराक्रम गाजवलेल्या या स्त्रीयांनी स्त्रीत्व कसोशीने जपलेले दिसतेय.हल्लीच्या मुलींना स्त्री देहाचा अभिमान वाटत नाही.स्त्रीत्व दर्शक मासिक स्त्राव हा मनोकायिक छळ वाटतो.यातुनच नैराश्य ग्रासित भाव उत्पन्न होतात.पुढे स्त्री शरीरात स्त्रवणारे प्रोजेस्टेराॅन,इस्ट्रोजन,यांचे असुंतलन होते.सतत पुरुषी हावभाव ,पेहराव,पुरुषी विचारधारा यामुळे स्त्री देहात पुरुषत्व दर्शक संप्रेरके स्त्रवायला लागतात.आणि स्त्रीत्व , प्रजननक्षमता ओसरते.आपण महादेवाच्या एका रुपाला अर्धनारीनटेश्वराच्या रुपात पाहतो.यात महादेवाच्या निम्म्या अंगात देवी पार्वती वास करते.प्रत्येक पुरुषात वत्सल माता असते तर प्रत्येक स्त्रीमध्ये उत्पत्ती,स्थिती आणि लयाची शक्ती ठेवणारा खंबीर,प्रसंगी विनाशकारी महादेव ही वसतो.फक्त या दोन्ही तत्वांची सरमिसळ न करता संतुलन गरजेचे आहे.हल्लीचे वाढते वंध्यत्व, प्रजजन अंगाचे कर्करोग,पाळीच्या समस्या, गर्भाशय निर्हरण शल्यक्रिया यांची गरज हे शरीरातील स्त्रीत्वावरील आघात आहे . स्त्रीदेहाची कर्तव्ये,भावनिक गरजा,श्रम,क्लम, श्रमपरिहार ह्या सगळ्या बाबी पुरुष देहापेक्षा कैकपटीने भिन्न असतात.हे समाजास कळणे गरजेचे आहे.
मुली शिकुन आर्थिक रित्या संपंन्न होत आहे.त्यांची सहचारी निवड निकष तात्विक आहे.जर हे निकष पुर्णत्वास जात नसतील तर त्या सरळ अविवाहीत आयुष्य जगण्यास तयार आहेत.किंवा करिअर व स्वातंत्र्य यात कौटुंबिक जबाबदाऱ्या नकोत म्हणून पुरुष व स्त्रीया एकत्रीत राहुन देहाच्या गरजा भागवताना दिसत आहे,.कुटुंबसंस्था ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे.आर्थिक स्थिरतेनंतरही जेव्हा कधी तरी मानसस्थिरतेची गरज असते तेव्हा स्त्रीपुरूष दोघांनाही एकमेकांच्या आधाराची गरज असते. आत्मिक सुखाची अनुभुती देणार्या भारतीय संस्कृतीचे डोहाळे उगाच लागले नाहीत.
आयुर्वेदामध्ये " नास्ति मुलंविनौषधी"असे म्हटले आहे. पृथ्वीवरील उत्पन्न एखाद्या वनस्पतींचा काहीच उपयोग नाही अशी एकही वनस्पती नाही तर व्दिपाद, चतुष्पाद, किटक, पशुपक्षी यांतील मादी देह निर्मितीचा हेतूही तेवढाच खास आहे. बुद्धीजिवी मानवजातीने स्त्री देहाचा पर्यायाने निसर्गानिर्मितीचा खास आदर करावा,त्यास कसोशीने जपावे.हे स्त्री व पुरुष दोघांचेही कर्तव्य आहे.
-वैद्य सुवर्णा चरपे
सर्वोदय चौक, वणी
स्त्री आणि स्त्रीत्व....
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 08, 2025
Rating: