ग्रामपंचायत कानडा चे वतीने महिला दिन साजरा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : जागतिक महिला दिनानिमित्त कानडा येथे महिला जनजागृती चा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या अध्यक्षा संरपच सौ. सुषमा रूपेश ढोके तर, मार्गदर्शक म्हणून शांताबाई ईंगळे (उमरखेड), नूरता निमसटकार (मार्डी), यांचै महिला सक्षमीकरण, ग्रामस्वच्छता, महिला सबलीकरण, बालविवाह, दारुबंदी,ग्रामसभा इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले.तसेच गावातील प्रतीक्षा आस्कर, सुवर्णा डाहूले, सुवर्णा येवले, अल्का चामाटे, गीता झीले, अर्चना धोबे, संगीता येवले, पुष्पा ढोके व गावातील असंख्य महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिक्षा बदखल तर, आभारप्रदर्शन वंदना येवले यांनी मानलेत.
ग्रामपंचायत कानडा चे वतीने महिला दिन साजरा ग्रामपंचायत कानडा चे वतीने महिला दिन साजरा Reviewed by सह्याद्री चौफेर on March 09, 2025 Rating: 5
Powered by Blogger.