वणीत पाणपोईचे उदघाटन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : येथील गांधी चौक तुटी कमान नजीक पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून पाणपोई सुरु करण्यात आली आहे.

वणी शहरातील श्री जैन महिला मंडळ यांच्या पुढाकारातून पाणपोई हा मानवी दिलासादायक उपक्रम परमपूज्य १००८ आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या ३३ व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त राबविण्यात आला.
    
सामाजिक कार्यकर्ते विजयबाबू चोरडिया यांनी या पाणपोईचे उदघाटन केले. यावेळी दीपक छाजेड श्री जैन महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ प्रमिला चंद्रकुमार चोरडिया, सचिव रूपाजी खिवंसरा, सहसचिव विद्या मुथा, सदस्य ज्योतीबाई चोरडिया, प्रिया कटारिया, राखी कुचेरिया, शोभा खिवंसरा, अंशुमा झाबक, पुष्पा कोटेचा, प्रेमा चोरडिया यांच्यासह मंडळाच्या सदस्य उपस्थित होत्या.

या सामाजिक उपक्रमाने वाटसरू, फेरीवाले यांना सूर्य आग ओकणाऱ्या उन्हामध्ये थंड पाण्याची सोय झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
वणीत पाणपोईचे उदघाटन वणीत पाणपोईचे उदघाटन Reviewed by सह्याद्री चौफेर on March 28, 2025 Rating: 5
Powered by Blogger.