सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
यावेळी समाजात फक्त निःस्वार्थ कार्य करतात अशा महिलांचा सत्कार करण्यात आला. नंदा शेलवडे, मंगला झिलपे, भारती सरपटवार यांना शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. भरतनाट्यम पारंगत नृत्य प्रशिक्षक आणि नृत्यांगणा सूचना बंगाले यांनी उपस्थित महिलांना महिलांविषयी मार्गदर्शन केले.
नृत्य स्पर्धेत चार गट असून प्रथम क्रमांक अ गट योगन्या वासेकर ब गट सुरज धनुष्यकर, पैठणी विजेत्या महिला क गट सुनीता डाबरे, ड गट समूह नृत्य मध्ये गोंडी नृत्याला प्राप्त झाले. शेतकरी लॉन चे कार्यवाहक व मानवी हक्क परिषदेच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष मनीषा सुरेंद्र निब्रड यांचा प्रयास संस्थेचे अध्यक्ष पौर्णिमा शिरभाते व त्यांच्या चमूने उत्कृष्ट आयोजनाकरिता त्यांचा सपत्नीक सत्कार केला.
स्पर्धेचे परीक्षण नागपूर येथील शुभांगी सरोदे, अश्विनी मानेकर, गौरव श्रीरंग यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रियंका कोटनाके, आभार सागर मुने यांनी मानले. या स्पर्धेकरिता सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया, जय जगन्नाथ पतसंस्थेचे अध्यक्ष संजय खाडे यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता पंढरीनाथ सोनटक्के, राजु खुसपुरे, सुरेखा वडीचारे सुमित्रा घोडे, प्रिया कोणप्रतिवार, निशा उपरे, जयश्री सोनटक्के,संदीप बेसरकर, राजू धावन्जेवार, वृषाली मुंजेकर, स्नेहल कोटनाके यांनी परिश्रम घेतले.
विदर्भ नृत्य स्पर्धेत योगन्या वासेकर व सुरज धनुष्यकर प्रथम
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 28, 2025
Rating: