सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील साई मंदिर चौक रसोई हॉटेल मध्ये ही आग लागल्याचे समजते. गुरुवार दि. 27 ला रात्री 1 ते 1.30 वाजता च्या दरम्यान ही आग लागल्याचे बोलल्या जात आहे. आग लागल्याने काही वेळ मोठा गोंधळ निर्माण झाला. या आगीत हॉटेलमधील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवतहानी झाली नसल्याचे वृत्त समोर आले नाही. मात्र, ही आग नेमकी कशी लागली हे अद्याप समजू शकले नाही.
ही आग गुरुवार मध्यरात्रीच्या वेळी लागली होती. आग लागल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये तिथे पोलीस प्रशासन दाखल झाले त्यांनी अग्निशमन दल पाचारण केले आणि आग नियंत्रणात आणली. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी ही भीषण आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, हॉटेलमध्ये मोठा स्फ़ोट झाल्याची चर्चा आहे.
घटनेचा व्हिडीओ पहा :
वणीत हॉटेलमध्ये भीषण आग,संपूर्ण साहित्य जळून खाक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 27, 2025
Rating: