वणी उपविभागात 'महाकुंभ' तीर्थदर्शन सोहळा संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : सामाजिक समरसतेचा मंत्र घेऊन वणी उपविभागीय क्षेत्रातल्या 33 वस्तीमध्ये तीर्थ कलश दर्शन सोहळे संपन्न झाले.
प्रयागराज येथे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान भरलेला महाकुंभमेळा आता संपन्न झाला आहे. हा 45 दिवसांचा धार्मिक कार्यक्रम होता, ज्यामध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी भाग घेतला. परंतु ग्रामीण भागातील यामध्ये जे 'महाकुंभ' ला जाऊ शकले नाहीत, त्यांच्या पर्यंत तीर्थ कलश दर्शन आणि जल पोहोचवण्याचे कार्य अनुलोम भाग वणी च्या वतीने उपविभाग प्रमुख सुनील दालवनकर, वैभव मेहता व वैभव सुर भाग जनसेवक यांनी केले.
याप्रसंगी मार्गदर्शन हरिभक्त परायण मुन्ना महाराज तुघनायत,
दीपक नवले, घनशाम आवारी, चिंतेश्वरजी वैद्य, गजानन विधाते, प्रज्योत हेपट, अमित उपाध्ये यांनी तीर्थ कलश दर्शन दरम्यान केले.
वणी उपविभागात 'महाकुंभ' तीर्थदर्शन सोहळा संपन्न वणी उपविभागात 'महाकुंभ' तीर्थदर्शन सोहळा संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on March 26, 2025 Rating: 5
Powered by Blogger.