आईपण आणि बाईपण
दोन्ही जिवांचा सांभाळ करते,
ति आई कुठे काय करते..!
आईचो माया मुलांना देते,
बाई म्हणून संपुर्ण वेळ घरात देते,
जबाबदारी सोबत, सर्वांचा सांभाळ करते,
ति आई कुठे काय करते..!
डोक्यावर जरी बापाचं छप्पर असले तरी,
त्या घराला घरपण आई देते,
नऊ महीने स्वतः त्रास घेते,तेव्हा ति एका बाळाला जन्म देते, शिक्षणासोबत त्यांना संस्कार करते,
ति आई कुठे काय करते..!
घरातला त्रास सर्वांची कटकट सहन करते,
समाज काय बोलले. नेहमी ति एकच विचार करते,
ति आई कुठे काय करते..!
दुःख जरी असले तरी सर्व संकटांवर मात करते,
पोट च्या गोळ्याला लहाण्याचं मोठं करते,
ति आई कुठे काय करते..!
सौ. समीक्षा गणेश डवरे देऊळकर
रा. खरवड, ता. वरोरा, जि. चंद्रपूर
बाईपण....सौ समीक्षा गणेश डवरे देऊळकर यांच्या शब्दात
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 26, 2025
Rating: