वणी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : येथील पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज शनिवारी रात्री ८ वाजता पार पडली. 

रमजान ईद, रामनवमी, भगवान महावीर जयंती, हनुमान जयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वणी पोलीस ठाण्याच्या आवारात शांतता कमेटीची सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात रमजान ईद, रामनवमी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततापूर्ण वातावरणात उत्सव साजरे करावे. कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये याची दक्षता घ्यावी, असे पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी सांगितले.

यावेळी पुरुषोत्तम पाटील सर, रवि बेलुरकर, मंगल तेलंग, यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. यावेळी राजाभाऊ पाथ्रडकर, नारायण गोडे, दिपक छाजेड, रमेश येरणे, संतोष डंभारे, सत्यजित ठाकुरवार, नितीन बिहारी, सौ.शालिनीताई रासेकर, मंदाताई बांगडे, विजयाताई आगबत्तलवार,सौ. आरती वांढरे, सौ सुमित्राताई गोडे यांच्यासह महिला प्रतिनिधी व पत्रकार बांधव उपस्थित होते.

यावर्षी श्री रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होणार 

दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री राम नवमी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. २२ वर्षांपासून सर्व धर्माचे सहकार्य लाभत असुन मला कोणत्याही समाजाचा त्रास झाला नाही असे श्री राम नवमी उत्सव समितीचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांनी शांतता कमेटीच्या बैठकीत सांगितले. यावर्षी राम लल्ला, श्री कृष्ण, हनुमानाची मुर्ती, साई रथ, रामाची पालखी, तसेच लाईव्ह हनुमान व शेगाव येथील रिंगण भेदी भजन मंडळ वणी करांना मंत्रमुग्ध करणार आहे. त्यामुळे यावर्षी मोठ्या संख्येने श्री राम भक्त उपस्थित राहणार असल्याची माहिती श्री रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांनी दिली.
वणी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न वणी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on March 29, 2025 Rating: 5
Powered by Blogger.