वणी पोलिसांची उत्तम कामगिरी: बसस्थानकातून दोन विद्यार्थ्यांचे चोरी गेलेले मोबाईल दिले तत्काळ परत मिळवून

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : महाराष्ट्र पोलीस ! राज्यातच नाहीत तर जगभरात महाराष्ट्र पोलिसांची ख्याती पसरली आहे. आतापर्यंत पोलिसांनी अनेक गुन्ह्यांची उकल करून, गोवंश तस्करी असो की, विद्यार्थ्यांचा मुद्देमाल काही वेळात परत मिळवून दिल्यामुळे वणी पोलिसांची कामगिरीवर समाधान व्यक्त होत आहे. वणी पोलिसांच्या कर्तव्याच्या या इतिहासात वणी पोलिसांनी आणखी एक सुवर्ण नोंद केली. वणी बसस्थानकावरून दोन विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरीला गेले,ते बाजारात पोहोचण्यापूर्वीच त्या विद्यार्थ्यांना परत मिळवून दिले. 
   
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारी २०२५ रोजी 
वणी बस स्थानकावरून दोन विद्यार्थी तक्रारदार नामे आकाश विशाल भोयर (वय २१), रा. वणी व आणखी एक विद्यार्थीनी हे दोघे बस स्थानक, वणी येथून गावी जात असताना बस मध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे २ मोबाईल चोरून नेले, सदर बाबत पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त होतात, डे ऑफिसर पो.हे.का.पाटील व त्यांचा रायटर पो. का. ललित नवघरे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन, गोपनीय सूत्रांकडून प्राप्त माहिती अन्वये चोरी गेलेले मोबाईल एक तासाचे आत हस्तगत करुन तक्रारदारांना मिळवून दिले. तक्रारदार हे विद्यार्थी असून, त्यांना महत्त्वाचे फॉर्म भरणे असल्याने करिता वेळ नसल्या कारणाने, त्यांना पो.स्टे.ला तक्रार करावयाची नसल्याचे त्यांनी विनंती केली. त्यामुळे तक्रारदार यांच्या विनंतीवरून त्यांना त्यांचे दोन मोबाईल परत करण्यात आले.तसेच पोलिसांवरती चा विश्वास दृढ व द्विगुणी झाल्याची प्रतिक्रिया त्या दोनही विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला.

सदर कारवाई गोपाल उंबरकर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वणी यांचे मार्गदर्शनात पो.हे. का.पाटील, पो. का. ललित नवघरे आदीसह पोलीस स्टेशन वणी यांनी केली.


  
वणी पोलिसांची उत्तम कामगिरी: बसस्थानकातून दोन विद्यार्थ्यांचे चोरी गेलेले मोबाईल दिले तत्काळ परत मिळवून वणी पोलिसांची उत्तम कामगिरी: बसस्थानकातून दोन विद्यार्थ्यांचे चोरी गेलेले मोबाईल दिले तत्काळ परत मिळवून Reviewed by सह्याद्री चौफेर on March 03, 2025 Rating: 5
Powered by Blogger.