मालमत्ता व पाणी करावरील व्याज व दंडाची रक्कम माफ करण्याची मागणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : मार्च एंडींग मध्ये वणी न. प. कडून मालमत्ता व पाणीकराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. परंतु सदरहु करावर भरमसाठ रक्कम व्याजाचे स्वरुपात आकारण्यांत येत असल्यामुळे कराच्या रक्कमेत मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. वरिल व्याजाचे बाबतीत न. प. वणी मध्ये चौकशी केली असता, संगणक प्रणालीतील सॉफ्टवेअरमुळे व्याजाची रक्कम माफ अथवा कमी करता येत नाही असे केविलवाणे उत्तर मिळत आहे.

करीता मालमत्ता व पाणीकरावर आकारण्यात येत असलेले व्याज माफ करण्यात यावे. जेणेकरुन नागरीकांना कर भरतांना सुलभता येईल, यासासाठी व्याज माफीचा ठरावसुद्धा करण्यांत यावा अशा प्रकारचे निवेदन मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीन देण्यात आले. 
यावेळी मानवी हकक सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष राजु धावंजेवार, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष विकेश पानघाटे, वणी विधानसभा भाऊसाहेब आसुटकर, वणी शहर अध्यक्ष अजय चन्ने, यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख सौ. सुमित्रा गोडे वणी तालुका महिला अध्यक्ष, सौ. सुनीता काळे वणी शहर महिला अध्यक्षा सौ. प्रमिला चौधरी व सुरेश बन्सोड महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य, परशुराम पोटे प्रदेश कार्यकारी सदस्य, वामनराव कुचनकार प्रदेश कार्यकारी सदस्य, संदिप बेसरकर महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य, ज्ञानेश्वर बोनगीनवार, अमोल कुमरे, मारेगांव तालुका अध्यक्ष, यवतमाळ जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ. मनिषा निब्रड तसेच इतर सदस्य उपस्थित होते.
मालमत्ता व पाणी करावरील व्याज व दंडाची रक्कम माफ करण्याची मागणी मालमत्ता व पाणी करावरील व्याज व दंडाची रक्कम माफ करण्याची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on March 03, 2025 Rating: 5
Powered by Blogger.