अध्यक्षपदी भैय्याजी कनाके यांची निवड

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या मारेगाव तालुका अध्यक्ष पदी भैय्याजी कनाके यांची निवड करण्यात आली. तालुका पातळीवर आदिवासी समाजाचे सामाजिक प्रश्न सोडविणे तसेच आदिवासी समाजाची सेवा करावी, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे सामाजिक, संघटनात्मक कार्य शहरी तसेच ग्रामीण भागात वृद्धिंगत करावे या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा अध्यक्ष नरेश गेडाम यांनी नियुक्ती पत्र दिले.यावेळी सर्व तालुका अध्यक्ष उपस्थित होते.
     
मी मागील 15 वर्षांपासून राजकीय व सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतलेले आहे. या माध्यमातून अनेकांची कामे केलेली आहे. आता तर मला या सेवेसाठी समाज संघटनेचे बळ मिळालेले आहे.माझी केलेली नियुक्ती ही समाजाच्या तसेच समाज बांधवांच्या सेवेसाठी असेल. समाजाला न्याय मिळवून देऊन समाजाच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर असेल असे मत भैय्याजी कनाके यांनी व्यक्त केले.भैय्याजी कनाके यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
अध्यक्षपदी भैय्याजी कनाके यांची निवड अध्यक्षपदी भैय्याजी कनाके यांची निवड Reviewed by सह्याद्री चौफेर on March 03, 2025 Rating: 5
Powered by Blogger.