Top News

चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : चार वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन मुलाने तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. फिर्यादीवरून मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विधीसंघर्ष बालकास अटक केली.

प्राप्त माहितीनुसार, मारेगाव तालुक्यातील एका गावात पीडिताचे आईवडील कामावर गेले होते. आजी सह ती घरी असतांना ही पिडीत बालिका आवारात खेळत होती. अशातच एका अल्पवयीन बालकाने जनावरांच्या गोठ्यात घेवून जात त्याठिकाणी अत्याचाराचा प्रयत्न केला. दरम्यान, पिडीतेचा पालक गावात येताच चिमुकलीचा शोध घेतला असता संशयित गोठ्यातून बाहेर पडला व पिडीता तेथेच आढळली. मुलीला विश्वासात घेत आईने विचारपूस केल्यानंतर हा गंभीर प्रकार दि. 2 मार्च रोजी समोर आला. 

पोलिसांनी अल्पवयीन विरुद्ध बालकांचे लैंगिक शोषण विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केली. पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.
Previous Post Next Post