प्रेस क्लब पांढरकवडाची कार्यकारिणी जाहीर

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

पांढरकवडा : प्रेस क्लब पांढरकवडा या पत्रकार संघटनेची कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून अध्यक्षपदी प्रविण पिन्नमवार तर सचिव पदी रवि वल्लमवार याची येथील शासकीय विश्राम गृहात घेण्यात आलेल्या एका विशेष सभेत अविरोध निवड करण्यात आली.

यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार संभा मडावी होते.जेष्ठ पत्रकार अशपाक खान,रवि वल्लमवार यांनी प्रविण पिन्नमवार यांचे नाव अध्यक्ष पदासाठी सुचविले तर योगेश मडावी,गणेश सामजवार यांनी अनुमोदन दिल्यानंतर सर्व सदस्यांनी एकमताने अध्यक्षपदी प्रविण पिन्नमवार यांची अविरोध निवड केली.पत्रकार संघटनेच्या माध्यमातून सामाजिक,शैक्षणिक उपक्रम राबविण्यासोबतच पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू असे आश्वासन नवनिर्वाचित अध्यक्षानी दिले.

सदर सभेत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.त्यात उपाध्यक्षपदी सफी खान,कोषाध्यक्षपदी योगेश मडावी यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून संभा मडावी,अशपाक खान,तनविर शेख,संतोष मग्गीडवार,गणेश सामजवार,वाजीद कुरेशी यांची निवड करण्यात आली.
प्रेस क्लब पांढरकवडाची कार्यकारिणी जाहीर प्रेस क्लब पांढरकवडाची कार्यकारिणी जाहीर Reviewed by सह्याद्री चौफेर on March 03, 2025 Rating: 5
Powered by Blogger.