युवासेनेचे अजिंक्य शेंडे यांच्या प्रयत्नाने अपघातग्रस्तांना मिळाली आर्थिक मदत

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : काल शुक्रवारी वणी वरून वैयक्तिक काम आटोपून गावाकडे परततांना मोटरसायकल ला हायव्हा ट्रकने धडक दिल्याने तालुक्यातील ब्राह्मणी येथील दोन जणांना गंभीर दुखापत झाल्याची घटना दिं. 28 फेब्रुवारी ला सकाळी साडे दहा च्या दरम्यान घडली होती. 

यात महादेव उपरे (45) व महादेव मंगाम (55) यांना गंभीर इजा होऊन हात फ्रॅक्चर झाला असे समजते. त्यांना सर्वप्रथम वणी येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर चंद्रपूरला त्यांना हलविण्यात आले, तेथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. सदर अपघात भयावह होता असे प्रत्यक्षदर्शी कडून सांगण्यात येत होते.

या घटनेची माहिती युवासेना उपजिल्हाप्रमुख तथा शिववाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य शेंडे यांना कळताच त्यांनी अपघातग्रस्तांची लगेंच भेट घेऊन विचारपूस केली व त्यांची हालचाल घेत माहिती जाणून घेतली. दरम्यान,वाहन क्रमांक (एम एच ४० सीएम ५१५९) याजकडून पिडीत अपघातग्रस्ताना मदत देण्यास मालक टाळाटाळ करत असल्याचीही कळल्यानंतर अजिंक्य शेंडे हे आपल्या कार्यकर्त्यांसह संबंधित कोलवाशरी अधिकाऱ्यांशी अपघात ग्रस्तांची परिस्थिती समजावून सांगत कोल प्रशासनाला धारेवर धरले व त्यांना आर्थिक मदत करण्यास भाग पाडले. यांच्या प्रयत्नाने अपघातग्रस्तांना आर्थिक मदत मिळाली, पीडिताकडून त्यांच्यासह संपूर्ण कार्यकर्त्यांचे आभार मानले जात आहे. 

यावेळी योगेश उपरे, यश खामणकर, रुपेश उपरे, सुजित काळे, रमेश डाखरे, अक्षय आवारी, प्रीतम राजगडे, नागेश काकडे, हनुमान आवारी, गणेश काळे, विवेक राजगडे, बीटा राजगडे, मनोज वाकटी, कुंदन पेंदोर आदी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
युवासेनेचे अजिंक्य शेंडे यांच्या प्रयत्नाने अपघातग्रस्तांना मिळाली आर्थिक मदत युवासेनेचे अजिंक्य शेंडे यांच्या प्रयत्नाने अपघातग्रस्तांना मिळाली आर्थिक मदत Reviewed by सह्याद्री चौफेर on March 01, 2025 Rating: 5
Powered by Blogger.