अन्न विषबाधा उद्रेक नियंत्रणासाठी दक्षता बाळगावी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : सार्वजनिक कार्यक्रमात आयोजित महाप्रसादासह सामुदायिक भोजनामध्ये अन्न विषबाधा उद्रेकाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे. त्यामुळे अशा घटनाच्या नियंत्रणासाठी स्थानिक प्रशासनासह नागरिकांनी दक्षता बाळगावी असे, आवाहन मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड यांनी प्रसिध्दी पत्रकातुन केले आहे. 

गाव पातळीवर सार्वजनिक कार्यक्रमात महाप्रसाद सह सामुदायिक भोजनाने होणाऱ्या विषबाधेला आळा बसविण्याकरिता जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांना सध्याच्या काळात आयोजित होत असणाऱ्या सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांमध्ये महाप्रसाद किंवा सामुदायिक जेवण यांचे सेवन केल्यामुळे अन्नविषबाधेचे उद्रेक मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्याकरिता तालुक्या आरोग्य अधिकारी यांना पुर्व सुचना देणे करिता व अन्नविषबाधेच नेमक कारण शोधण्याकरिता पत्रकाद्वारे कळविले असुन अन्नविषबाधेस कारणीभुत बाबी, बाधित व्यक्तीमध्ये आढळणारी लक्षणे, या वर उपाय करणे, जबाबदार व्यक्ती किंवा संस्था यांची माहिती, उपाययोजना व कार्यवाही याची माहिती घेणे या सुचना करण्यात आल्या आहे. 

या पार्श्वभूमीवर विषबाधा चा उद्रेक होऊ नये म्हणून त्यावर उपाययोजना करण्याकरिता सतर्क राहून विषबाधेवर हव्या त्या उपायोजना कराव्या व विषबाधेला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करून विषबाधावर आळा घालावा व तो अहवाल सादर करावा या करिता जिल्हा आरोग्य विभागांकडून तालुका आरोग्य विभागाला सुचना करण्यात आल्या आहे.
अन्न विषबाधा उद्रेक नियंत्रणासाठी दक्षता बाळगावी अन्न विषबाधा उद्रेक नियंत्रणासाठी दक्षता बाळगावी Reviewed by सह्याद्री चौफेर on March 01, 2025 Rating: 5
Powered by Blogger.