सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : येथील रहिवासी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दीनानाथ आत्राम (गुरुजी) वय ७१ यांचे आज बुधवार दि. १९ मार्च ला सायंकाळी ६ वा. अकस्मात निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने शहरात शोककळा पसरली आहे.
दिवंगत आत्राम गुरुजी यांनी शहरातील नगर परिषद शाळा क्र. 3, शाळा क्र. 4 मध्ये मुख्याध्यापक म्हणून प्रमोशन, मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावली. येथील नगर परिषद शाळा क्र 8 मधून ते मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांनी वणी तहसील कार्यालयात आजतागायत निशुल्क सेवा देत होते. शांत व संयमी व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. धार्मिकतेचा त्यांच्यावर चांगला पगडा होता. बुधवारी अचानक सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
गुरुवार दि. 20 मार्च ला श्री दीनानाथ आत्राम यांच्यावर दुपारी 2.9 वाजता स्थानिक मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यदर्शनासाठी मोठ्या संख्येने शहरातील जानेमाने नागरिक तसेच प्रशासनातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
दीनानाथ आत्राम गुरुजी अनंतात विलीन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 20, 2025
Rating: