सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी शहर हे औद्योगिक क्षेत्र म्हणून परिचित आहे. वणी शहरात वाहतूक ही फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वणी शहरातील प्रत्येक चौकात वाढत्या अतिक्रमणामुळे ट्राफिक जाम होते हि नेहमीची समस्या असून ट्राफिक जाम झाल्यामुळे नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरात भरदिवसा होणारी जड वाहतूक बंद करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून केली आहे याबाबतचे निवेदन पोलिस उपनिरीक्षक सिता वाघमारे वाहतूक उपविभाग वणी यांना देण्यात आले.
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी चौकात तर दररोज मोठी गर्दी असते आणि त्यातही दुकानदार आपले दुकान फलक रस्त्यावर ठेवतात त्यामूळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. गांधी चौकातील व्यापाऱ्यांचा माल नेहमी ट्रकने येतो, दररोज २ ते ३ ट्रक माल येतो हा माल सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत खाली करण्यात येत आहे. दिवसा जर ट्रक आला तर वणी शहराची वाहतूक व्यवस्था ठप्प होवून सामान्य नागरीकांना त्रास होतो. त्यामुळे दिवसा होणारी जड वाहतूक बंद करण्यात यावी, तसेच वणी शहरात सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांवर कारवाई करणेकरीता मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने पोलिस उपनिरीक्षक (वाहतूक विभाग) तर्फे निवेदन देण्यात आले.
यावेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष राजु धावंजेवार, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष विकेश पानघाटे. वणी विधानसभा भाऊसाहेब आसुटकर, वणी शहर अध्यक्ष अजय चन्ने, यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख सौ. सुमित्रा गोडे वणी तालुका महिला अध्यक्ष, सौ. सुनीता काळे वणी शहर महिला अध्यक्षा सौ. प्रमिला चौधरी व सुरेश बन्सोड महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य, परशुराम पोटे प्रदेश कार्यकारी सदस्य, वामनराव कुचनकार प्रदेश कार्यकारी सदस्य, संदिप बेसरकर महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य, अमोल कुमरे, मारेगांव तालुका अध्यक्ष, यवतमाळ जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ. मनिषा सु निब्रड तसेच इतर सदस्य उपस्थित होते.
वणी शहरात दिवसा होणारी जड वाहतूक बंद करण्याची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 20, 2025
Rating: