सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : येथील रुक्मिणी कोल वॉशरी (RIPL) मध्ये काळा भ्रष्टाचार झाल्याची जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे वणी तालुका अध्यक्ष अरबाज अहेमद खान यांनी आज दि. २० मार्च रोजी शासकीय विश्राम गृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.
याबाबत संबंधित विभाग व पोलीस विभाग वणी, यांना निवेदने सादर करून अवगत केले, मात्र सर्वांनी दुर्लक्ष केल्याचेही यावेळी त्यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
पुढे प्रश्न उत्तराला सामोरे जाताना अरबाज खान यांनी सांगितले की, राजूर येथील रुक्मिणी कोल वॉशरी महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (MAHAGENCO) यांची ५० हजार टन कोल वॉश चे काम दिले आहे. परंतु रुक्मिणी कोल वॉशरी येथून भोंगळ कारभार चालू असल्याचा त्यांनी थेट संबंधितावर आरोप केला आहे.
कोल वॉश करून फक्त महाजनको या कंपनीला ४० टक्के कोळसा व ६० टक्के डस्ट हे मिश्रण करून रेल्वे डब्यानी महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या कंपनी ला पाठवीत आहे. व इतर वॉश केलेला कोळसा ते मार्केट मध्ये उच्च भावात विकून महाजनको या कंपनी ची फसवणूक करून त्यांच्यापासून १०० टक्के कोळसाचा पैसा वसुल करीत आहे. असेही ते म्हणाले.
येथील होणाऱ्या भोंगळ कारभारावर आळा घालण्याकरिता व रुक्मिणी कोल वॉशरी ची योग्य तपासणी करून योग्य कारवाई करण्याकरिता अरबाज खान यांनी संबंधिताना अनेक वेळा निवेदने सादर केले असल्याचे त्यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. तसेच या भोंगळ कारभाराविरुद्ध हायकोर्टात पि्टीशन दाखल करणार असल्याचेही त्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
रुक्मिणी कोल वॉशरीत काळा भ्रष्टाचार : अरबाज खान यांची पत्रकार परिषदेत माहिती
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 21, 2025
Rating: