सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : मारेगाव पंचायत समीतीच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या गोंडबुरांडा येथील श्री दर्शन भारती विद्यालयाच्या वतीने महीला पत्रकार प्रतिभा तातेड यांच्या वाढदिवसा निमित्त किशोरवयीन मुलींसाठी एकदिवसीय स्वच्छता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुनिल आष्टकर होते, विषेश अतिथी म्हणुन पत्रकार प्रतीभा तातेड होत्या, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन आशा पर्यवेक्षीका,वंदना बोंडे,आशा वर्कर, वैशाली दानखडे,पोर्णिमा तोडासे,विवेकानंद कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालच्या प्रा.प्रीयंका पोटे,प्रा.जाधव, गोदावरी जोशी,प्रामुख्याने विचार मंचावर उपस्थित होते. यावेळी सांध्य दै.मार्मिकच्या तालुका प्रतिनिधी प्रतीभा तातेड यांचा अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त वाढदिवसाचा केक कापुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. किशोरवयीन मुलींनी आरोग्याचे दृष्टीने घ्यावयाची काळजी व शारिरीक स्वच्छता या विषयावर तज्ञा कडुन मार्गदर्शन करण्यात आले. मुलींना मार्गदर्शन करताना केवळ महीलांनाच सभागृहात स्थान देण्यात आले होते. मार्गदर्शना नंतर मात्र सभागृहा बाह्य पुरुषांना सभागृहात पुनः आमंत्रीत करण्यात आले होते.प्रास्ताविक संजय मोघे यांनी सुत्रसंचालन कु.ज्ञानेश्वरी गेडाम,यांनी तर आभार कु. अंकीता जुमनाके यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने किशोरवयीन मुलींनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या विद्यार्थ्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी अथक परिश्रम घेतले.
पत्रकार प्रतीभा तातेड यांचा अभिष्टचिंतन सोहळा सपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 21, 2025
Rating: