आमटे दांपत्य 'शिक्षणव्रती' पुरस्काराचे मानकरी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : अतिशय दुर्गम भागात अबोलपणे अजोड शैक्षणिक कार्य करणाऱ्या अनिकेत प्रकाश आमटे व समीक्षा अनिकेत आमटे यांचा गौरव त्यांना 'शिक्षणव्रती' पुरस्कार प्रदान करुन करण्याचा निर्णय जैताई देवस्थान शिक्षण समितीने घेतला असल्याचे समितीचे अध्यक्ष माधव सरपटवार व सचिव मुन्नालाल तुगनायत यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

पुरस्काराचे स्वरुप ११००० रुपये रोख, स्मृतिचिन्ह,शाल व श्रीफळ आहे. या वर्षी विशेषे करुन हा पुरस्कार देण्यात येत आहे. पुरस्काराचे हे सातवे वर्ष असून या पूर्वी हा पुरस्कार उत्कृष्ट अध्यापकाला प्राचार्य राम शेवाळकर स्मृति उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार या नावाने देण्यात येत होता. या वर्षी हा पुरस्कार 'प्राचार्य राम शेवाळकर स्मृति शिक्षणव्रती' पुरस्कार या उपाधीने विशेष बाब म्हणून दिला जाणार आहे. दरवर्षी हा पुरस्कार पू.मामा क्षीरसागर स्मृतिदिनानिमित्त ६ एप्रिलला प्रदान करण्यात येतो. परंतु या वर्षी ६ एप्रिलला रामनवमी असल्याने हा पुरस्कार दि.५ एप्रिल रोजी सायं. ७ वाजता जैताई मंदिराच्या प्रांगणात ज्येष्ठ संपादक देवेंद्र गावंडे यांच्या हस्ते आमटे दांपत्याला प्रदान करण्यात येणार आहे.

अनिकेत गेल्या २१ वर्षांपासून तर, समीक्षा गेल्या १७ वर्षांपासून हेमलकसा येथील आश्रम शाळेला व १० वर्षां पासून नेलगुंडा येथील साधना विद्यालयाला आदर्श शाळा म्हणून आकार देण्यात यशस्वी झाले आहेत हे उल्लेखनीय.
आमटे दांपत्य 'शिक्षणव्रती' पुरस्काराचे मानकरी आमटे दांपत्य 'शिक्षणव्रती' पुरस्काराचे मानकरी Reviewed by सह्याद्री चौफेर on March 20, 2025 Rating: 5
Powered by Blogger.