सावर्ला येथील घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्यात यावी-प्रवीण खानझोडे

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : तालुक्यातील सार्वला येथील घरकुल लाभार्थ्यांना नोव्हेंबर २०२४ मधे महाराष्ट्र शासनाच्या वतीने वणी पंचायत समितीच्या माध्यमातून घरकुल मंजूर होऊन त्याचा १५००० रुपयाचा पहिला हफ्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला व त्यानुसार त्यांनी राहते घर उकलून घरकुल बांधायच असल्याने तात्पुरती राहायची व्यवस्था केली.

मात्र,फक्त रेतीअभावी घरकुल लाभार्थी आज उघद्यावर आले आहे. त्यामुले तहसीलदार वणी यांना सार्वला येथील घरकुल लाभार्थी ने रेती उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवीण खानझोडे लढा संघटना चे संयोजक वणी यावेळी सार्वला येथील गावातील लाभार्थी पांडुरंग आवगाण, श्रीराम चिव्हाने, कर्नू नैताम, शंकर बावणे, विकास चौधरी, जंगलू नैताम, सुनीता ठमके, संतोष मडावी, संजीवनी मुन, प्रताप मुन, उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश शेंडे, अजय धोबे, आशिष रिंगोले, विकेश पानघाटे यांचीही उपस्थिती होती.
सावर्ला येथील घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्यात यावी-प्रवीण खानझोडे सावर्ला येथील घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्यात यावी-प्रवीण खानझोडे Reviewed by सह्याद्री चौफेर on March 19, 2025 Rating: 5
Powered by Blogger.