वणीत 22 मार्चला विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : येथील मनिषा सुरेंद्र निब्रड व संस्कार भारती समिती आणि सागर झेप बहुउद्देशीय संस्था वणी यांच्या संयुक्त विद्यमाने वसंत जिनींग, येथे जागतिक महिला दिन निमित्त २२ मार्चला साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त अ गट, ब गट, क गट, व ड गट अशी विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

यानिमित्त सकाळी अकरा मान्यवरांच्या उपस्थित दीपप्रज्वलन व जागतिक महिला दिन सोहळा होणार आहे. त्यानंतर दोन ते दहा या वेळात नृत्य स्पर्धा होणार आहे. अ- वयोगट ६ ते १३ असेल, ब- वयोगट १४ वरील आहे तर क-गट हा फक्त महिलाकरिता असणार आहेत. यासाठी (अ) गटाची १०० रुपये, (ब) गटाची २०० रुपये, (क) गट १०० रुपये, तर (ड) गट, महिला स्पेशल समूह नृत्य स्पर्धा गटाची २०० रुपये अशी फी ठेवण्यात आली आहे. स्पर्धेत काही नियम घातले आहे. ते पुढीलप्रमाणे असणार आहे. 
१) पेनड्राईव्ह किंवा मोबाईल मध्ये गाणे असावे. 
२) कोणत्याही गीतावर नृत्य सादर करता येईल,  
३) एकल नृत्याचे गीत फक्त 3 मिनिट राहील. 
४) समूह नृत्य ५ मिनिटांचे राहील.    
५) प्रत्येक स्पर्धेकाला नोंदणी शुल्क देतांना फार्म भरून देणे आवश्यक राहील. 
६) सर्व अधिकार आयोजकांचे राहील. 

पारितोषिक म्हणून प्रथम क्रमांकास, द्वितीय, तृतीय, प्रोत्साहन सन्मानचिन्ह देऊन सर्व स्पर्धेकांना गौरविण्यात येणार आहे. महिलांकरिता खास बक्षिसे देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सागर मुने यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
वणीत 22 मार्चला विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन वणीत 22 मार्चला विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन Reviewed by सह्याद्री चौफेर on March 19, 2025 Rating: 5
Powered by Blogger.