सह्याद्री चौफेर | विनोद माहुरे
राळेगाव : उपविभागीय अधिकारी राळेगाव यांच्या नेतृत्वात महसूल पथकाने रात्री च्या दरम्यान,अवैध रेती वाहतुक करणाऱ्या दहा टाॅक्टर पकडून वडकी पोलिस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आले. या कार्यवाहीने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील झुल्लर येथील वर्धा नदी पात्रातून अवैधरित्या रेतीची वाहतुक तीन दिवसांपासून सुरू असल्याची माहिती विशाल खत्री उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना मिळाली. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी यांनी महसुल पथकाला बोलावून दिनांक ७-३-२५ रोजी रात्री १ वाजताच्या दरम्यान, झुल्लर येथील वर्धा नदी च्या पात्रातून अवैध रेती वाहतूक करीत असतांना जवळपास दहा टाॅक्टर मिळाले. यात १) टाॅक्टर क्रमांक एम.एच.२९ ऐ.के १२९८ परिक्षित रमेश फुटाणे यांच्या मालकीचा ट्राॅलीसह, २) टाॅक्टर क्रमांक एम.एच.२९ बि.सि.२४३४ कुणाल रविंद्र ठाकरे यांच्या मालकीचा ट्राॅलीसह, ३) टाॅक्टर क्रमांक एम.एच २९ ऐ.के ६७६२ दिनेश बाबाराव काळे यांच्या मालकीचा ट्राॅलीसह, ४) टाॅक्टर क्रमांक एम.एच.२९ बि.सि.०.८५७ ब्रम्हानंद पुंडलिक कोरडे यांच्या मालकीचा ट्राॅलीसह, ५) टाॅक्टर क्रमांक एम.एच.२९ ऐ.के११८० विनोद शंकर देवकर यांच्या मालकीचा ट्राॅलीसह, ६) एम.एच.२९ बि.पी.४०२८ कुणाल अविनाश शिंदे यांच्या मालकीचा ट्राॅलीसह, ७) एम.एच.२९ ऐ.के १३३६ स्वप्नील भावराव महल्ले यांचा मालकीचा ट्राॅलीसह, ८) एम.एच.३२ ऐ.एम.४६२८ ईमरखा पठाण यांच्या मालकीचे टाॅक्टर, ९) एम.एच.२९ बि.पि.६१२० स्वप्नील प्रभाकर खंडाळकर यांच्या मलिकीचे ट्राॅलीसह, १०) टाॅक्टर क्रमांक एम.एच.२९ बि.पि.६६८३ हेमंत देविदास वाभिटकर यांच्या मालकीचा ट्राॅलीसह, वडकी पोलिस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आले आहे.
मोठ्या प्रमाणात तालुक्यातील ट्रॅक्टर जप्त केल्याने अवैध रेती वाहतुक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.जिल्ह्यातील सर्वात मोठी अवैध रेती वाहतूकीची कार्यवाही असल्याचे बोलल्या जात आहे.
अवैध रेती वाहतुक करणारे दहा टाॅक्टर वडकी ठाण्यात केले जमा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 07, 2025
Rating: