सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
निवेदनात म्हटले आहे की, वणी न.प हद्दीतील मालमता व पाणीकर मालमत्ता धारकाकडून कर वसूल करण्यात येत आहे. संभवतः मालमता व पाणीकर धारकांनी काही अपरिहार्य कारणास्तव तसेच आर्थिक अडचणीमुळे कराची रक्कम वेळेत भरणा केली नाही. मात्र आता अनेक करधारक सध्यास्थितीत कराचा भरणा करण्यास तयार आहेत. परंतु भरमसाठ रक्कम व्याजाचे स्वरुपात आकारण्यात आली आहे. याबाबतचे यापूर्वी अनेक निवेदन दिले. त्यावेळी शिवसेनेच्या शिष्ट मंडळाला व्याजाची रक्कम माफ करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु नगर पालिकेने कोणतीही चर्चा केली नाही किंवा व्याजाची रक्कम माफ केली नाही निव्वळ जनतेची लूट करीत आहेत.
नगर परिषदेचे उत्पन्न वाढविण्याकरिता भरमसाठ रक्कम व्याजाचे स्वरुपात आकारण्यात आल्यामुळे सामान्य नागरिकांना त्याचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अगोदरच महागाईची डोकेदुखी आणि त्यात व्याजाची भरमसाठ रक्कम कराचे स्वरुपात आकारणे म्हणजे सामान्य नागरिकांवर सपशेल अन्याय ठरत आहे. यापूर्वी नगर पालिकेने व्याज माफ करून मुद्दल रक्कम वसूल केली आहे.
एकीकडे घाण पाण्याचा पुरवठा, त्यातही वर्षातून केवळ सहा महिने पाणीपुरवठा मात्र वार्षिक अहवाल करआकारणी केल्याने हा वणीकर जनतेवर अन्याय असून, ब्रिटिश राजवट असल्यागत जनतेला अनुभव येत आहे.
कराचे स्वरूपात आकारण्यात येत असलेली व्याजाची रक्कम माफ करून वरील कर मुद्दल स्वरुपात आकारण्यात यावी, जेवढे दिवस पाणी पुरवठा केला जातो तेवढेच दिवसाची कर आकारणी करावी, अन्यथा १० मार्च नंतर नगर पालिका विरोधात युवासेनेकडून तिव्रस्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे, मनोज वाकटी, कुंदन पेंदोर, मिलिंद बावणे, निखिल मडावी, बादल येसेकर, गौरव पांडे, अनुप पोटे, आर्य राऊत, अमोल अरेल्वर, रोशन काकडे, आशु ठाकूर, इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.
यावर १० मार्च पर्यंत काही उपाय योजना न केल्यास जनआंदोलन उभारणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
युवासेनेचा नगर परिषदेला 10 मार्च पर्यंत अल्टीमेटम
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 07, 2025
Rating: